दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; पहिल्या सामन्यातील महत्वाचे चार खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; पहिल्या सामन्यातील महत्वाचे चार खेळाडू संघाबाहेर

चेन्नई : चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर जाणार हे अपेक्षित होते, पण त्याचसोबत पहिल्या कसोटीत डाव पलटवणारा जेम्स अँडरसन यालाही संघातून बाहेर करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन या दोघांच्या जागी संघात स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स या दोन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या कसोटीत उत्तम कामगिरी करत पाच गडी मिळवणाऱ्या फिरकीपटू डॉम बेस यालाही संघाबाहेर करण्यात आलं असून मोईन अलीला संघात स्थान देण्यात आलं आहे. दमदार फलंदाज जोस बटलर यालाही संघातून वगळ्यात आलं आहे. बेन फोक्स आणि ओली स्टोन या दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ खेळाडूंचा संघ
जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन फोक्स आणि ऑली स्टोन.