IPL 2021: पंजाबने मॅक्सवेलला दाखवली वाट; प्रितीच्या संघाने ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम
क्रीडा

IPL 2021: पंजाबने मॅक्सवेलला दाखवली वाट; प्रितीच्या संघाने ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम

चंदीगढ : आयपीएल २०२०मध्ये गुणतक्त्यात सहाव्या स्थानी समाधान मानांव लागलेल्या प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंजाद ग्लेन मॅक्सवेलला घरचा रस्ता दाखवला आहे. आता यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार पंजाबची संघमालक प्रिती झिंटा आणि संघ व्यवस्थापनाचा आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, हार्डस विल्जॉएन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉट्रेल, जिमी नीशम, कृष्णाप्पा गौथम, तजिंदर सिंह या खेळाडूंना किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने करारमुक्त केले आहे. तर के एल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हूडा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार आणि ईशान पोरेल या खेळाडूंना कायम ठेवले आहे.

गतवर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत पंजाबच्या संघाने धमाकेदार खेळ करून दाखवला. पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार कामगिरी करत आपली छाप उमटवली. पण शेवटच्या टप्प्यात केलेल्या चुकांमुळे ते प्लेऑफची फेरी गाठू शकले नव्हते.