IPL 2021 : मुंबईने मलिंगाला केला बाय-बाय; हे खेळाडू ठेवले कायम
क्रीडा

IPL 2021 : मुंबईने मलिंगाला केला बाय-बाय; हे खेळाडू ठेवले कायम

मुंबई : IPL2021साठी आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाने श्रीलंकेचा तेज गोलंदाज लसिथ मलिंगाला बाय-बाय केला आहे. मलिंगासोबत मिचेल मॅक्लेनेघन यांसारख्या बड्या नावांना सोडचिठ्ठी दिली. तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या मॅचविनर खेळाडूंना संघात कायम राखले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी आणि मोहसीन खान या खेळाडूंना मुंबई इंडियन्सने कायम ठेवले आहे. तर लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेरफाने रूदरफर्ड, प्रिन्स बलवंत राय आणि दिग्विजय देशमुख या खेळाडूंना मुंबईने करारमुक्त केले आहे.

दरम्यान, IPL 2020मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. कोणत्याही संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पाच वेळा पटकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच सलग दोन वर्षे स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरणारा चेन्नईनंतर मुंबई केवळ दुसरा संघ ठरला. मुंबईच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१९ आणि २०२० अशी दोन्ही विजेतेपदे सलग जिंकली. मुंबईकडून अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. पण काही खेळाडूंना संधी मिळू शकली नाही.