मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिनने वाहिली श्रद्धांजली
क्रीडा

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिनने वाहिली श्रद्धांजली

मुंबई : वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघाचा कर्णधार मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डच्या वडिलांचे निधन झाले आहे. पोलार्डने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. या दु:खद घटनेनंतर पोलार्डने आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत पोलार्ड आणि त्याचे वडील आयपीएल करंडकांसह दिसत आहेत. पोलार्डने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मला माहित आहे की, तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही एका चांगल्या ठिकाणी असाल. तुम्ही बर्‍याच लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. मी तुम्हाला नेहमी सन्मानित करत राहीन, अशा आशयाचे कॅप्शन पोलार्डने फोटोला दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज संघाने नुकत्याच झालेल्या वनडे आणि टी-20 मालिकेत श्रीलंकेला पराभूत केले. 9 एप्रिलपासून होणाऱ्या आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाचा भाग असेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पोलार्डच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. मला तुझ्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली आहे. या दु: खाच्या प्रसंगी मी शोक व्यक्त करतो. देव तुम्हाला या नुकसानापासून मुक्त होण्यासाठी सामर्थ्य देईल, असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

टी-20 स्टार म्हणून नाव कमावलेल्या पोलार्डचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. 12 मे 1987 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे पोलार्डचा जन्म झाला. पोलार्डला त्याच्या आईने वाढविले. एका मुलाखतीत पोलार्डने सांगितले होते की, त्याची आई मोलमजुरी करून पैसा उभा करत होती. कधीकधी कुटूंबाला फक्त एका वेळेचे जेवण मिळत होते.