अजिंक्यच्या नेतृत्वात आतापर्यंत १० जणांनी केलं पदार्पण; नावे एकदा पाहाच
क्रीडा

अजिंक्यच्या नेतृत्वात आतापर्यंत १० जणांनी केलं पदार्पण; नावे एकदा पाहाच

सिडनी : कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं मोजक्याच सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आतापर्यंत तब्बल १० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. २०१५ मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या संघाची धुरा रहाणेच्या खांद्यावर होती. रहाणेच्या नेतृत्वात मनीष पांडेने पहिल्यांदा पदार्पण केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पांडेने त्या दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर, त्याच दौऱ्यावर टी-२०मध्ये केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, मनिष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि संजू सॅमसन अशा तब्बल सहा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

२०१७ मध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेकडे नेतृत्व देण्यात आलं. धर्मशाला कसोटी सामन्यात कुलदीप यादवनं भारतीय संघाकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता विराट कोहली मायदेशी परतल्यामुळे रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांनी पदार्पण केलं होतं. तर तिसऱ्या कसोटीत नवदीप सैनीनं पदार्पण केलं आहे, अशा एकूण १० खेळाडूंनी आतापर्यंत पदार्पण केलं आहे. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सध्या भारतीय संघाची धुरा रहाणेच्या खांद्यावर आहे.