क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ऑलिम्पिकमध्ये होणार समावेश?
क्रीडा

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ऑलिम्पिकमध्ये होणार समावेश?

टोकियो : ऑलिम्पिक २०२०च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक कार्यरत गट स्थापन करण्यात आला आहे, त्यांच्यावर ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रक्रियेची जबाबदार असेल. ऑलिम्पिक २०२८, २०३२ आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल.

आयसीसीने म्हटले आहे की, सुमारे ३० दशलक्ष क्रिकेट चाहते अमेरिकेत राहतात, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. १२८ वर्षापुर्वी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. १९००मध्ये पॅरिस येथे ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटन आणि यजमान फ्रान्सने या स्पर्धेत घेतला होता.