मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. डाव या मराठी चित्रपटातील अंधार हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित असलेल्या डाव या चित्रपटात अंधार हे गाणं आहे. डाव हा सस्पेन्स, थ्रिलर अशा धाटणीचा सिनेमा आहे. अंधार हे गाणं लेखक मंदार चोळकर यांनी लिहिलं असून संगीत जीत गांगुली यांनी दिलं आहे. डाव या सिनेमाचं दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केलं आहे.
Presenting my new Jazz song for upcoming @zeemusicmarathi suspense thriller movie- ‘अंधार’! A song of fear,indecisiveness beautifully composed by @jeetmusic . Listen to it 👉 https://t.co/Iig1WOyKNF
मराठी चित्रपट ‘अंधार‘ मधील @jeetmusic यांनी संगीतबद्ध केलेले माझे गीत नक्की ऐका☝️ pic.twitter.com/xcF4f9tGdf— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 7, 2021
अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं. दरम्यान, अभिनेता गुलश देवैया डाव या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहे. सागरिका घाटगेचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. या अगोदर सागरिकाने प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमात काम केलं आहे.