भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या प्रकारावर उन्मुक्त चंदने दिले स्पष्टीकरण
क्रीडा

भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या प्रकारावर उन्मुक्त चंदने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारताला क्रिकेटचा १९ वर्षाखालील विश्वचषक मिळवून देणाऱ्याा उन्मुक्त चंदने वयाच्या २८ व्या वर्षी भारतीय क्रिकेटला रामराम ठोकला. यानंतर उन्मुक्त चंदने एका मुलाखतील दिल्ली क्रिकेट असोसिएशनवर मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचे स्पष्टीकरण उन्मुक्त चंदने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उन्मुक्त चंद म्हणाला, मी मागच्या चार महिन्यापूर्वी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार देखील केला नव्हता. मात्र दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळून मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आणि निवृत्ती जाहीर केली. उन्मुक्त चंदने स्पोर्टक्रिडाला मुलाखत दिली त्यामध्ये त्याने असे सांगितलं आहे.

मागची काही वर्षे माझ्यासाठी संघर्षमय ठरली. मागच्या सीझनमध्ये मला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. वारंवार तीच सत्ता येत होती आणि मला वाटतं होतं की, संधी मिळेल की नाही. माझ्यासाठी बाकावर बसून राहणं एक मानसिक छळ होता. कारण ज्या खेळाडूंना सामना खेळण्याची संधी मिळत होती. त्यांना मी क्लब टीममध्ये सहभागी करणार नाही. मी याबाबत विचार करून माझा वेळ वाया घालवू इच्छित नव्हतो. यासाठी मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या कारकिर्दीचे अजून काही वर्षे बाकी आहेत. मी चांगलं क्रिकेट खेळू इच्छितो. मधल्यामध्ये वेशीवर टांगून राहणं चुकीचं ठरलं असतं, असं उन्मुक्त चंदने मुलाखतीत सांगितलं.