भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला; थोडक्यात बचावले
राजकारण

भाजप अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला; थोडक्यात बचावले

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. याबाबतचं अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे. पश्चिम बंगालच्या अयोध्या नगरजवळ जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला असून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा यात हात असल्याचा थेट आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा सुखरूप आहेत. मात्र, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. जेपी नड्डा यांचा पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज गुरुवारी दुसरा दिवस आहे. ते मुख्यमंत्री ममता बनर्जी याचे पुतणे आणि खासदार अभिषेक बनर्जी यांचा मतदार संघ डायमंड हार्बर जात होते. या दरम्यान, जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. त्याच्या ताफ्यावर तुफान दगडफेक केली.

या घटनेनंतर भाजपनं तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीच जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. मात्र, टीएमसीनं भाजपचे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी भाजप राज्यात सक्रिय झालं असल्याचे बोलले जात आहे.