विराट कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम
क्रीडा

विराट कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला जात असताना विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतासाठी सर्वाधिक वेळा कर्णधारपद भूषविण्याचा मान त्याला मिळाला आहे. विराट कोहलीने ६१ कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने ६० सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

धोनीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने २७ कसोटी सामन्यात विजय, तर १८ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दुसरीकडे कोहलीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने ३६ कसोटी सामन्यात विजय, तर १४ कसोटी सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाऊस आणि वातावरणाचा अंदाज घेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने हा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पावसाने अडथळा आणला. साऊथम्प्टनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्याचा राखीव दिवसही वापरला जाणार आहे. म्हणजे जर हवामान चांगले असेल तर सामना संपूर्ण पाच दिवसांचा असेल. प्रत्येक दिवशी ९८ षटकांचा खेळ खेळला जाईल.