मुलांमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखून सुरतहून वडोदऱ्याला आले होते हिमांशु पांड्या
क्रीडा

मुलांमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखून सुरतहून वडोदऱ्याला आले होते हिमांशु पांड्या

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्याच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे आज (ता.१६) निधन झालं. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपल्या मुलांच्या यशासाठी हिमांशू पांड्या यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. हिमांशू पांड्या सुरतमध्ये कार फायनान्सचा व्यवसाय करत होते. परंतु आपल्या मुलांना क्रिकेटपटू बनविण्यासाठी यांनी सुरतहून वडोदरा यथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कारण सुरतपेक्षा वडोदऱ्यात क्रिकेटसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे हिमांशू पांड्या यांनी आपला व्यवसाय बंद केला.

हिमांशु पंड्या यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या बऱ्याच नातेवाईकांनी मुलांना फक्त क्रिकेट खेळू देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु आम्ही आमचा विश्वासावर ठाम होतो. हिमांशु पांड्या म्हणाले की, ‘मुलांनी खूप कष्ट केले. मी सूरतमध्ये होतो. कृणाल 6 वर्षांचा होता, मी त्याला गोलंदाजी शिकवायचो. हे पाहून मला वाटले की, तो एक चांगला खेळाडू होऊ शकतो. सुरतच्या रांदेड़ जिमखाण्यात आम्ही सराव करायचो. एकदा किरण मोरे यांच्या मॅनेजरने कृणाल फलंदाजी करताना पहिले आणि त्यांनी कृणालला वडोदरा येथे त्यांचे भविष्य चांगले असल्याचे सांगितले. 15 दिवसांनंतर मी त्याला वडोदराला घेऊन गेलो आणि तेथून क्रिकेटचा प्रवास सुरू झाला.

हार्दिक पांड्याने 2017 मध्ये जेव्हा श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकले तेव्हा त्याने आपल्या वडिलांना कार गिफ्ट केली. त्यावेळी हार्दिक पांड्याने ट्विटमधून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यात त्याने त्याच्या वडिलांना आयुष्यातील सर्व आनंद मिळाला पाहिजे. असे म्हंटले होते. पंड्याने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय वडिलांना दिले. पांड्याने लिहिले की, ”माझ्या वडिलांनी आपल्या मुलांच्या कारकीर्दीसाठी सर्व काही सोडले होते, त्यासाठी खूप धैर्याची आवश्यकता आहे.”