मोठी बातमी : सचिन तेंडुलकर आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : सचिन तेंडुलकर आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात

नागपूर : शेतकरी आंदोलनाबद्दल आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी ट्वीट केले होते. त्यांच्या ट्वीटबद्दल भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे, एकूण 12 जणांची ओळख झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘सेलिब्रिटींच्या ट्वीट प्रकरणात माझा शब्दाचा विपर्यास केला गेला. आम्ही भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे. 12 लोकांची ओळख झाली आहे, त्यांची चौकशी होणार आहे’, अशी महत्त्वाची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. देशमुख हे कोरोनातून बरे झाले असून आज (ता. १५) त्यांना सुट्टी मिळाली. नागपूरच्या एक खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर 5 फेब्रुवारी पासून उपचार सुरू होता. आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सेलिब्रिटींच्या चौकशी प्रकरणावरून खुलासा केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबद्दल तक्रार केली होती. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्वीट केले होते. यातील शब्द सुद्धा अगदी एकसारखेच होते. या सेलिब्रिटींनी एक सारखे ट्वीट केले का या संदर्भात दबाव नेमका कोणाचा होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्वीट एकसारखेच होते. त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.