पुणे महापालिकेकडून लॉकडाऊनसाठी सुधारित आदेश; असे असतील नवीन नियम
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात सरसकट सूट नाहीच; या ४ टप्प्यांतील शक्यतांची चाचपणी सुरु

मुंबई : राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून ठाकरे सरकार लॉकडाऊन वाढवणार की उठवणार यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाउन शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाउन उठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

1 जूननंतर राज्यात असे असेल लॉकडाऊन

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्यात वाढ करून 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला. हा लॉकडाऊन 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. याचदरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
देश बातमी

१ जूननंतर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान

मुंबई : फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यानं राज्यांनी निर्बंधाचाची साखळी आवळण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रातही १४ एप्रिलपासून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली. आता राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे. मात्र, त्यानंतर चित्र कसं असेल, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दुसरीकडे लॉकडाउन वाढवण्याकडेच इतर राज्यांचा कल दिसून येत असून, आज झालेल्या एका बैठकीत […]

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन? उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रात कोरोना स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता […]

धक्कादायक! पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली
पुणे बातमी

धक्कादायक! पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्यातील स्थितीची दखल उच्च न्यायालायने घेतलेली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील माधव वाघाटे या गुन्हेगाराची व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झालेल्या वादानंतर हत्या करण्यात आली. वाघाटेची हत्या झाल्यानंतर रविवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेदरम्यान दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला; अशी आहे नवी नियमावली!

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा ३१मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 15 मेपर्यंत असणारे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा आदेश काढण्यात […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

राज्यात लॉकडाऊन वाढला; मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर […]

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

राज्यात लॉकडाउन वाढवण्याबाबत राजेश टोपेंचे मोठं विधान

मुंबई : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ठाकरे सरकारने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाउन नंतर १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसेच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
देश बातमी

उद्यापासून कर्नाटकमध्ये १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन

बंगळुरु : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. तरीही कोरोनाचे आकडे काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण दूर करण्यासाठी आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार […]

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देश बातमी

दिल्लीतील परिस्थिती बिकट; लॉकडाउनमध्ये वाढ

नवी दिल्ली : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाउननंतरही कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाउन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा […]