शेती

मोठी बातमी : शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी कर्ज

मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री अजित […]

इतर

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर शेतपिकांचे मोठे नुकसान

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा फैलावू लागला असतान दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागले आहे. मराठवाड्यासह आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत […]

बातमी महाराष्ट्र

मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळ आणि नापिकी आणि कर्जबाजरीपणाला कंटाळून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताना आपण पाहतो. मात्र हिंगोलीमधील एका तरुण शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप […]

राजकारण

अजित पवारांचा केंद्राला इशारा; शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही

अमरावती : “केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे हे कळायला मार्ग नाही, पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच, देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. असे यापूर्वी कधीही घडले नाही. आता काय मोगलाई लागली का? असा सवाल […]

राजकारण

रघुनाथ पाटलांचा अण्णा हजारेंना सल्ला; आता अण्णांनी निवृत्ती घ्यावी

सांगली : ”अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे,” असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा दिला. मात्र भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतले. अण्णांच्या या भूमिकेवर रघुनाथ पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अण्णांच्या […]

देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ

यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार अशी देशभर चर्चा रंगली होती. एकीकडे राजपथावर देशाचे सैनिकांची परेड तर दुसरीकडे सिल्लीच्या सीमांवर देशाचे शेतकरी आंदोलक परेड होणार होती. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर […]

देश बातमी

Farmers Protest : शेतकऱ्यांनी पोलिसांकडून बंदुका हिसकावल्या, बसेसची तोडफोड

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. किसान मजदूर संघर्ष समितीमधील आंदोलक मुकरबा चौक येथे पोहोचले. तिथून या आंदोलकांनी कांजवाला येथे जाणे अपेक्षित होते. पण बॅरिकेडस मोडून हे शेतकरी रिंग रोडच्या दिशेने निघाले आहेत. दिल्लीच्या मुकरबा चौक येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. बॅरिकेडस मोडून आत घुसण्याचा प्रयत्न […]

देश बातमी

कृषी कायदे मागे घ्या नाहीतर आम्ही कारवाई करु; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला इशारा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?”, असा सवाल करत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टात आज शेतकरी आंदोलनाशी संबंधित दाखल असलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली. मात्र केंद्र सरकारच्या या […]

देश बातमी

सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाबाबत आज सुनावणी होणार; कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आज आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे शेतकऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. राजधानी दिल्लीच्या सिंधू सीमेवर पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या 47 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक […]

राजकारण

तेव्हा ब्रिटीशांनी मारले आणि आता मोदी सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवून मारत आहे

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आणि सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ ठरली. ”आम्हाला कृषी कायद्यात बदल नको. कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल. असे शेतकरी नेत्यांनी सरकारला प्रत्येक बैठकीत ठणकावून सांगितले आहे. पण भाजपचे मोदी सरकार अहंकाराने पेटले आहे. कडाक्याच्या थंडीत, मुसळधार पावसातही शेतकरी पेटून उठला आहे. हे असे प्रेरणादायी चित्र स्वातंत्र्यपूर्व काळातही दिसले […]