उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल
राजकारण

उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल

मुंबई : “नोटीस भाजपाच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपाच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे. उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल.” असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केल आहे. आज पहाटे चार वाजताच रोहित पवार मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी माथाडी […]

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह
देश बातमी

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. पण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही.” अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]

लक्षात ठेवा…खुनाचे प्रयत्न आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा संघर्ष मिटवता येणार नाही
राजकारण

लक्षात ठेवा…खुनाचे प्रयत्न आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा संघर्ष मिटवता येणार नाही

मुंबई : हरियाणातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना खुनी ठरवले. खुनाच्या प्रयत्नाचे आणि दंगलीचे खोटे गुन्हे दाखल करून बळीराजाचा हा संघर्ष मिटवता येणार नाही. हे हरयाणा आणि केंद्रातील सत्ताधिशांनी लक्षात ठेवावे. अशा शब्दात शिवसेनेने आज सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि खट्टरसरकारवर टीका केली आहे. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर अंबालामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. कृषी कायद्यांविरोधात […]

नरेंद्र मोदी केवळ मोजक्या भांडवलदारांसाठी काम करतात
राजकारण

नरेंद्र मोदी केवळ मोजक्या भांडवलदारांसाठी काम करतात

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित होते. दरम्यान याआधी पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखत प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेत कारवाई केली. फक्त तीनच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. […]

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल
राजकारण

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : ”जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राहुल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कृषी […]

केंद्रसरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला भाजपा नेते देशद्रोही म्हणतात : संजय राऊत
राजकारण

केंद्रसरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला भाजपा नेते देशद्रोही म्हणतात : संजय राऊत

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केला जात आहेत. सत्ताधारी पक्ष आणि माध्यमांच्या एका गट कधी त्यांना देशद्रोही म्हणत आहेत तर कधी दहशतवादी किंवा चीन-पाकिस्तानचा एजंट म्हणून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अशा आरोपांमुळे लोक चांगलेच संतापले आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटले जाण्यावरही विरोधकांनी आक्षेप […]

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव
राजकारण

शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील

पुणे : ”केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्या वेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत […]

ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न
देश बातमी

ते शेतकरी आहेत ! सरकारचे जेवण नाकारत जमीनीवर बसून स्वतःचेच खाल्ले अन्न

नवी दिल्ली : शेतकरी एकवेळ स्वतःच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर आले तर काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिल्लीत शेतकरी करत असलेले आंदोलन आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने गुरुवारी घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ […]

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकार सोबतची बैठक निष्फळ
देश बातमी

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकार सोबतची बैठक निष्फळ

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि ४० शेतकरी नेत्यांमध्ये बैठक झाली. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत आहे. यापार्श्वभूमीवर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत सात तास चाललेली बैठक यशस्वी होऊ शकली नाही. या बैठकीत शेतकरी नेते कृषी कायद्यांमध्ये […]

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव
देश बातमी

‘बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे’; आंदोलक शेतकऱ्यांनी धुडकावला केंद्राचा प्रस्ताव

नवी दिल्ली : ”बुराडी खुल्या तुरुंगासारखे आहे. त्यामुळे आम्ही तिथे कधीच जाणार नाही. असे म्हणत दिल्लीतील अनोलक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारचे आवाहन धुडकावून लावले आहे. कृषी विधेयक २०२० विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन केले होते. मात्र […]