पश्चिम महाराष्ट्र बातमी

साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचे (वय ७२) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, डी एम बावळेकर, नितीन पाटील, राजूशेठ राजपुरे, विराज शिंदे आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन […]

राजकारण

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; ६ जण जखमी

सातारा : साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेचे दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडले आहेत. साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद सर्वश्रुत आहे. मात्र बुधवारी शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती […]

बातमी महाराष्ट्र

कोकणाला पुन्हा झोडपणार पाऊस; राज्यातील ७ जिल्ह्यांना अलर्ट

पुणे : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपल्यानंतर राज्यात पावसानं उघड दिली आहे. महाराष्ट्रासह दक्षिणात्य राज्यांमध्ये पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण उर्वरित दक्षिण भारतात मात्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र अपेक्षित पाऊस झाला नाही. उत्तर महाराष्ट्र, […]

बातमी महाराष्ट्र

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरवर पुन्हा संकट; या सहा जिल्ह्यांना दिलाय यलो अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ३० जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, […]

बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य

मुंबई : पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

सभापतींकडून अधिकाऱ्यांस जीवे मारण्याची धमकी; उदयनराजेंकडून नाराजी

सातारा : सातारा पालिकेतील बांधकाम सभापतींनी वेळेत कामे होत नसल्याने मुख्याधिकारी व ठेकेदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिला आहेत. प्रभागात कामे होत नसल्याने भाजप नगरसेविका आणि सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांना अपशब्द वापरत […]

बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

बातमी महाराष्ट्र

कौतुकास्पद कार्य; राज्यात रस्ते बांधणीचा नवा विक्रम

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने कौतुकास्पद काम केले असून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. यामध्ये २५.५४ कि.मी रस्ता हा अवघ्या १४ तासांत पूर्ण करुन विजापूर-सोलापूर २५.५४ कि.मी रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विक्रम स्थापित केला आहे. असा तयार झाला रस्ता गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा भूकंप

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. गेल्या २ महिन्यामध्ये कोयना धरण परिसरात बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्यामुळे स्थानिकांमध्ये भिती आणि चिंतेचं वातावरण वाढू लागलं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

लॉकडाउनचा निषेध करत उदयनराजेंचं भीक मागो आंदोलन

सातारा : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार)दुपारी सातारा येथील पोवाईनाका येथे भीक मागो आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोतं टाकून त्यावर बसत त्यांनी हे भीक मागो आंदोलन केले. उदयनराजे यांनी या अगोदर देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आज हे […]