मुंबईची पुन्हा तुंबई ! रात्रभर तुफान पाऊस
बातमी मुंबई

मुंबईची पुन्हा तुंबई ! रात्रभर तुफान पाऊस

मुंबई : मुंबईची पुन्हा तुंबई झाली असून गुरुवारी रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात […]

गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या वाढणार अडचणी
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या […]

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
बातमी महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत

मुंबई : राज्यातील एकूण 10 महानगरपालिकांच्या निवडणूक फेब्रुवारीत नियोजित वेळेतच घेण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य १० महानगरपालिका, २० नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी या निवडणुका घेण्यासाठी उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विधानसभांच्या निवडणुका होऊ शकतात, तर महानगरपालिकांच्या निवडणुका […]

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
बातमी महाराष्ट्र

मुंबईत बरसणार सरी; तर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

मुंबई : यंदा राज्यात मॉन्सूनचं आगमन अपेक्षेपेक्षा अधिक लवकर झालं आहे. त्यामुळे आनंदी वातावरण असून मुंबईमध्ये गेल्या आठ्वड्यापासून मुसळधार पाऊस येतोय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचतंय. तसंच मॉन्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातही पाऊस बरसत आहे. मुंबईजवळच्या सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट या उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह […]

विवाहसोहळा, अंत्यसंस्कारांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना संख्या मर्यादा नको : उच्च न्यायालय
पुणे बातमी

नगराध्यक्ष राजू चौधरी हत्याप्रकरण; १२वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

पुणे : लोणावळा नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष मयत राजू चौधरी यांच्या हत्त्येप्रकरणी सुमित प्रकाश गवळी व जफर शेख यांची मुंबई उच्च न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २६ मे २००९ रोजी लोणावळा नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष राजू चौधरी यांची दिवसाढवळ्या नगरपालिकेमध्ये हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणामध्ये आरोपी सुमित गवळी व जफर शेख यांनी हत्या केल्याबाबत त्यांचे नाव […]

मालाडमध्ये मोठी दुर्घटना; इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
बातमी मुंबई

मालाडमध्ये मोठी दुर्घटना; इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मुंबई : मालाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चार मजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली. यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे. मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी […]

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज
बातमी महाराष्ट्र

येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा इशारा; असे आहेत जिल्हानिहाय अंदाज

मुंबई : प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबईकडून येत्या काही दिवसांमध्ये वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये १२ जून पर्यंतच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह पाऊस होणारे जिल्हे, मुसळधार पाऊस होणारे जिल्हे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणारे जिल्हे अशी यादी जरी करण्यात आली आहे. ही यादी पुढील […]

बीडमध्ये प्राध्यापिकेचा विनयभंग; प्राध्यापकाला ५ वर्षांचा शिक्षा
बातमी मुंबई

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप

मुंबई : महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रावर भेटलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इन्स्टावरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्यावर मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ३१ मे आणि १ जूनच्या रात्रीत ही घटना […]

ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तपास सुरु
बातमी मुंबई

ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तपास सुरु

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. साधारण एक तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. […]

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा
बातमी मुंबई

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

लोणावळा : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीने नोव्हेंबर २०२०मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक […]