गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची गरज – उच्च न्यायालय
देश

गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची गरज – उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनऊ न्यायाधीश म्हणाले की, गायीला संरक्षित राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची गरज आहे. देशात गोहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी निर्णय घ्यायला हवे होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. पाळीव प्राण्यांच्या संरक्षणाची गरज नेहमीच अस्तित्वात आहे. त्यामुळे, भारत सरकार जेव्हा गोवंश कत्तलीवर बंदी घालण्याचा निर्णय घेते तेव्हा ते गुरांना राष्ट्रीय संरक्षित प्राणी म्हणून घोषित करू […]

नवऱ्याने इच्छेविरुद्ध सेक्स केला तरी तो बलात्कार ठरत नाही – उच्च न्यायालय
देश बातमी

नवऱ्याने इच्छेविरुद्ध सेक्स केला तरी तो बलात्कार ठरत नाही – उच्च न्यायालय

नवी दिल्ली : छत्तीसगड उच्च न्यायालयाने नवऱ्याने बायकोवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील खटल्यात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित पत्नीसोबत पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्यास बलात्कार होत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र पत्नीचं वय १८ वर्षाखाली असू नये, असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने पतीला आरोपमुक्त केलं आहे. छत्तीसगड उच्च […]

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी
मनोरंजन

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी

“शिवसेनेच्या नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मुंबईत या खटल्यांची सुनावणी झाली तर माझ्याविरोधात भडास काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी मुंबईत न घेता हिमाचल प्रदेशमध्ये घेण्यात यावी”, अशी मागणी करणारी याचिका अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिने केली आहे. यावेळी कंगना रणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर खळबळजनक आरोप […]

निकिता जेकब यांना उच्च न्यायालयाकडून ३ आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जमीन मंजूर
देश बातमी

निकिता जेकब यांना उच्च न्यायालयाकडून ३ आठवड्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जमीन मंजूर

टूलकिट (दस्तावेज) प्रकरणी संशयित असलेल्या वकील निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने निकिता जेकब यांना ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. […]

कंगनाला न्यायालयाचा मोठा झटका; ‘तो’ अर्ज फेटळाला
मनोरंजन

कंगनाला न्यायालयाचा मोठा झटका; ‘तो’ अर्ज फेटळाला

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. फ्लॅटचे अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहेत. उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रानौतने […]

लैंगिक हेतूशिवाय कोणताही शारीरिक संपर्क पॉक्सोअंतर्गत गुन्हा ठरत नाही : उच्च न्यायालय
देश बातमी

लैंगिक हेतूशिवाय कोणताही शारीरिक संपर्क पॉक्सोअंतर्गत गुन्हा ठरत नाही : उच्च न्यायालय

मुंबई : उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या २७ वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याचबरोबर अनावधानाने किंवा कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय कोणताही शारीरिक संपर्क लैंगिक अत्याचार ठरत नसल्याने तो पॉक्सोअंतर्गत गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवत संबधित तरुणाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बारामती शहर पोलिसांनी आरोपीवर आयपीसीअंतर्गत व पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविला. […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय

औरंगाबाद : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी असून मुंबई उच्च न्यायालयाने एक दिलासा देणारा निर्यय घेतला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक मागासगटाचं प्रमाणपत्र तहसीलदारांनी द्यावे आणि त्याद्वारे प्रवेश घेण्याची मुभा न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिली आहे. याचिकादार विद्यार्थ्यांनी ईडब्लूएसमधून प्रवेश घेतला तर ते शिक्षणासाठी अन्य आरक्षणाचा […]

ठाकरे सरकार घेतंय कंगनाची बाजू; विरोधात आलेली याचिका बिनबबुडाची
बातमी मुंबई

ठाकरे सरकार घेतंय कंगनाची बाजू; विरोधात आलेली याचिका बिनबबुडाची

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार पहिल्यांदाच अभिनेत्री कंगना रानौतची बाजू घेताना दिसत आहे. कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात आलेल्या याचिकेला ठाकरे सरकारने विरोध केला आहे. ही याचिका बिनबुडाची असून त्यातील मागण्या अयोग्य असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. ट्विटर ही एक सोशल मीडियावर साइट आहे. त्यावर कुणी काय पोस्ट कारवं यावर […]

राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; कांजूर मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश
बातमी मुंबई

राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; कांजूर मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला असून कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश एमएमआरडीएला दिले असून भूखंडाची स्थिती आहे तशीच ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. […]

महाविकास आघाडीला दणका; कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे न्यायालयाचे आदेश
बातमी मुंबई

महाविकास आघाडीला दणका; कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे […]