अवघ्या ३० रुपयांत ६ OTT Platforms चे सबस्क्रिप्शन ऑफर करतेय ‘ही’ कंपनी
टेक इट EASY

अवघ्या ३० रुपयांत ६ OTT Platforms चे सबस्क्रिप्शन ऑफर करतेय ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली: Best OTT Plans: ओटीटी फॅन्ससाठी सध्या अनेक जबरदस्त प्लान्स लाँच करण्यात येत आहे. विशेष म्हणजे , सध्या युजर्ससाठी ब्रॉडबँड प्लानसह सुद्धा OTT सबस्क्रिप्शन दिले जात आहे. अशीच एक ऑफर Excitel ने सादर केली असून ऑफर अंतर्गत, ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व ३० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल. Excitel या OTT प्लॅटफॉर्मच्या सदस्यत्वांना त्याच्या रिचार्ज प्लॅनसह एकत्रित करत नाही. कंपनी ३०० Mbps आणि ४०० Mbps च्या स्पीड प्लानसह OTT पॅक ऑफर करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ते ८,५०,०० घरांशी जोडलेले आहेत आणि वेगाने विस्तारत आहेत. या ऑफर्सची माहिती पाहुया.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंपनीचा बेस प्लान ३० रुपयांपासून सुरू होतो. म्हणजेच तुम्हाला ३० रुपयांमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय, युजर्सना ६० रुपये, १०० रुपये आणि २०० रुपयांमध्ये OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते. तुम्हाला या सर्व प्लानचा लाभ फक्त हाय-स्पीड इंटरनेट प्लॅनसह मिळेल.

३० आणि ६० रुपयांमध्ये काय मिळेल?

३० रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना Epic ON, Shemaroo Me, Hungama Play, Hungama Music, ALT Balaji आणि Play box TV चे सबस्क्रिप्शन मिळत आहे. म्हणजेच, ३० रुपयांच्या मासिक खर्चात, तुम्हाला ६ प्लॅटफॉर्मची सदस्यता मिळेल. ६० रुपयांच्या मासिक रिचार्जमध्ये तुम्हाला Zee5, Sony LIV आणि Play BOX TV चे सबस्क्रिप्शन मिळेल.

१०० आणि २०० रुपयांमध्ये हे बेनेफिट्स:

१०० रुपयांच्या OTT प्लानमध्ये ग्राहकांना ZEE5, Sony LIV, Epic ON, Shemaroo Me, हंगामा प्ले, हंगामा म्युझिक, ALT बालाजी आणि प्ले बॉक्स टीव्हीचे सदस्यत्व मिळेल. त्याच वेळी, २०० रुपयांच्या प्लानमध्ये, युजर्सना ZEE5, Sony LIV, Disney + Hotstar, Epic ON, Shemaroo Me, हंगामा प्ले, हंगामा म्युझिक, ALT बालाजी आणि प्ले बॉक्स टीव्हीचे सबस्क्रिप्शन मिळेल.

सर्व प्लान्सच्या या किमती जीएसटी शुल्काशिवाय आहेत. केवळ हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन असलेल्या युजर्सनाच त्याचा लाभ मिळेल. जर तुम्ही १०० Mbps किंवा २०० Mbps चा प्लान वापरत असाल तर, या OTT पॅकचा लाभ मिळणार नाही.