त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारण

त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ”जेव्हा त्यांच्या मतपेट्या भरत नव्हत्या तेव्हा त्यांच्यासाठी मेहनत घेत होतो. पण, आता ते आमच्या कुटुंबावर हल्ला करत आहेत. मी कधीही वैयक्तिक हल्ले करीत नाही किंवा मत्सराने बोलत नाही. जसे त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले आहे. त्यांच्याकडून विकृत प्रवृत्तीचे राजकारण होत आहे. मात्र, मी त्यांच्या स्तरावर जाऊन हल्ला करणार नाही.” असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी काही वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या एक वर्षातील अनेक घडामोडींचा उल्लेख केला. तसेच पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपा आणि सत्तास्थापनेनंतर केंद्र सरकारशी बिघडलेल्या संबंधावर भाष्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ” मी उत्कटतेने काम करतो आणि त्याच तत्परतेने कोणत्याही विषयांवर बोलतो. मी कधीही वैयक्तिक हल्ले करीत नाही किंवा मत्सराने बोलत नाही. जसे त्यांनी माझ्या कुटुंबावर सूडबुद्धीने आघात केले आहे. त्यांच्यासोबत असताना आम्ही चांगले वागत होतो. जेव्हा त्यांच्या मतपेट्या भरत नव्हत्या तेव्हा त्यांच्यासाठी मेहनत घेत होतो. पण, आता ते आमच्या कुटुंबावर हल्ला करत आहेत. त्यांच्याकडून विकृत प्रवृत्तीचे राजकारण होत आहे.”

दरम्यान, याच काळात सत्तास्थापनेला काही दिवस लोटताच देशात, राज्यात, कोविडच्या रूपाने आरोग्याचे संकट उभे राहिले. ज्याने महाराष्ट्राचं चाक आणखी खोलात गेलं. त्यात केंद्राबरोबरचे संबंधही बिघडलेले. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते सरकार कोसळणार असल्याची भाकिते करत आहेत.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”त्यांना भविष्य सांगू द्या; ते व्यस्त आणि आनंदी आहेत. मला त्याचं स्वप्न खराब करायचं नाही. आपण ज्या परिस्थितीत सरकार चालवत आहोत, तो काळ (साथीच्या आजारामुळे) वेगळा आहे. शतकानंतर जगाने अशा परिस्थितीचा सामना केला आहे. यापूर्वी जो कोणी सरकार चालवत होता त्याला अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ”निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर आणि सतत पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्ती हाताळण्यास आम्हाला कोणतेही सहकार्य लाभले नाही. सप्टेंबरपासून केंद्राने पीपीई किट आणि एन -95 मास्क यासारख्या वस्तूंचा पुरवठा बंद केला. यामुळे राज्याचा आर्थिक बोजा सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांनी वाढला. तसेच, सुमारे 38,000 कोटी रुपयांचे जीएसटी आणि कर आकारणी थकबाकी अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. सरकार चालवणाऱ्या लोकांचा पक्ष किंवा विचारधारा महत्त्वाची असली तरी निःपक्षपातीपणे काम करणे हे केंद्रातील किंवा राज्यातले सरकारचे कर्तव्य आहे.”