#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
देश बातमी

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांची 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या वेशीवरच गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. संपूर्ण देशभरात या आंदोलनाची चर्चा होत आहे. मात्र आता येत्या 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली असून देशातील सर्व टोल बंद करणार असल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यापूर्वी मोदी सरकारच्या निषेधार्थ ५ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे पुतळेदेखील जाळणार आहोत. अशी माहिती पत्रकार परिषदेत […]

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट
राजकारण

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. याचदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. तर पुणे, नागपूर […]

जडेजासोबत चहल, नटराजनची कमाल; भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय
क्रीडा

जडेजासोबत चहल, नटराजनची कमाल; भारताचा ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रलियाकडून पराभूत झाल्यावर भारताने चांगलाच वचपा काढत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. भारतीय संघाने ११ धावांनी सामना जिंकत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाज टी नटराजन, युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीसमोर कर्णधार  अॅरॉन फिंच ३५ शॉर्ट ३४ यांच्या व्यतिरिक्त जास्तकाळ कोणीही तग धरु शकले नाही आणि १६२ धावांचा पाठलाग […]

अंतिम ११मध्ये नसतानाही चहल आला गोलंदाजीला; ३ बळीही घेतले
क्रीडा

अंतिम ११मध्ये नसतानाही चहल आला गोलंदाजीला; ३ बळीही घेतले

अंतिम ११मध्ये निवड झालेली नसताना युझवेंद्र चहल गोलंदाजीला आल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टी-२०सामन्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे सामन्याला वादाची किनार लागली आहे. फलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असताना सामनाधिकारी डेव्हीड बून यांनी जाडेजाच्या बदली युजवेंद्र […]

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल
बातमी मुंबई

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.यावेळी या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी […]

गांजा ड्रग्स नाही तर औषध ! भारतासह २७ देशांकडून समर्थन
बातमी विदेश

गांजा ड्रग्स नाही तर औषध ! भारतासह २७ देशांकडून समर्थन

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघात ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटविण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी झालेल्या मतदानात २७ देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले. विशेष म्हणजे यावेळी भारतानेही गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केलं आहे. तर, चीन […]

शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा; चक्क तुकराम मुंढेनी केले कौतुक
बातमी महाराष्ट्र

शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा; चक्क तुकराम मुंढेनी केले कौतुक

मुंबई: सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रणजितसिंह यांच्या या कामगिरीचे कौतुक चक्क आयएएसअधिकारी तुकाराम मुंढे यांनी […]

वाढदिवस विषेश : सचिन, धोनीपासून विराटपर्यंत कोणालाही मोडता आला नाही आगकरचा विक्रम
क्रीडा

वाढदिवस विषेश : सचिन, धोनीपासून विराटपर्यंत कोणालाही मोडता आला नाही आगकरचा विक्रम

मुंबई : भारतीय माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरचा आज वाढदिवस आहे. त्याच्या नावावर एक असा विक्रम आहे जो आजपर्यंत सचिन तेडुलकर, महेंद्र सिंह धोनीपासून विराट कोहलीपर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. एकदिवसीय सामन्यात आगरकरने २१ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. भारताकडून हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. हा विश्वविक्रम आजही त्याच्या नावावर अबाधित आहे. त्याचबरोबर, क्रिकेटची पंढरी म्हणून […]

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…
राजकारण

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…

मुंबई : ”म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाहीय. पण ठीक आहे, त्यांच त्यांना लखलाभ.” अशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना […]

कोविड-19 लसीच्या 160 कोटी डोसची नोंदणी करत भारताने मारली बाजी
कोरोना इम्पॅक्ट

कोविड-19 लसीच्या 160 कोटी डोसची नोंदणी करत भारताने मारली बाजी

भारताने आतापर्यंत कोविड-19 लसीच्या 160 कोटी डोसची नोंदणी केली आहे. कोरोना व्हायरसच्या लसीच्या डोसची नोंदणी करण्यात भारताने जगात पहिला क्रमांक मिळवला आहे. भारतात ऑक्सफोर्डच्या लसीचा सीरम इंस्टिट्यूट आणि एस्ट्रेजेनिकप्रमाणे क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत. त्यामुळे सर्वात जास्त ऑक्‍सफर्ड-एस्‍ट्राजेनेकाच्या वॅक्सिनची मागणी करण्यात येत आहे. अनेक देशांनी या लसीचे 150 कोटी डोस बुक केले आहेत. भारत आणि अमेरिकेने […]