पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट
राजकारण

पराभवानंतर भाजपाचे मनोबल वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांचे ट्विट

मुंबई : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. याचदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. तर पुणे, नागपूर या औरंगाबादमध्येही भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपासाठी हा धक्कादायक पराभव असल्याचं बोललं जात आहे. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे. ”वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो”, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे.

भाजपाला ६ जागांपैकी केवळ १ जागेवर विजय मिळवता आला. तीन पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांपुढे भाजपाचे प्रयत्न तोकडे पडले. या निवडणुकीत शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे भाजपाकडून सेनेच्या नेतत्वावर टीका केली जात आहे. यावर “सध्या सुरूवात वाईट झाली आहे. पण या वाईट सुरूवातीचा शेवट हा नक्कीच चांगला आणि सकारात्मक होईल”, असं ट्विट त्यांनी केलं. यासोबत त्यांनी जय महाराष्ट्र असा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं”, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच, तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही.