गुड न्यूज: राज्यसरकारकडून पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता
बातमी महाराष्ट्र

महापोर्टल रद्द करून ४ कंपन्या करणार राज्यातील भरती प्रक्रिया

मुंबई : राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8500 आणि पोलीस विभागातील पाच हजार 297 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र, राज्य सरकार महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार आहे. महापोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. या […]

आरोग्य विभाग भरती 2021 जाहीर: ‘या’ दिवशी होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभाग भरती 2021 जाहीर: ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांपैकी 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील. दरम्यान, या […]

तुम्ही लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहात?
बातमी महाराष्ट्र

तुम्ही लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहात?

नागपूर : देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना […]

गुड न्यूज: राज्यसरकारकडून पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता
बातमी महाराष्ट्र

गुड न्यूज: राज्यसरकारकडून पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता

मुंबई : राज्य शासनाच्या पदभरतीवर वित्त विभागाने आणलेल्या निर्बंधातून सूट देत पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी (ता.२१) काढण्यात आला. यापैकी २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक स्रोतांवर प्रतिकूल परिणाम झाला […]

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस
बातमी महाराष्ट्र

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांसाठी उरले अवघे काही दिवस

मुंबई : दहावी आणि बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आता काही दिवसच उरले आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 22 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. तर 29 एप्रिलपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. 12 वीच्या परीक्षेचा निकाल साधारण जुलै महिन्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड […]

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी नक्की काय झाले? वाचा सविस्तर

मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं होतं.तथापि, […]

मराठा आरक्षण सुनावणी स्थगित; आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण सुनावणी स्थगित; आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला

नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणी आज होणाऱ्या अंतिम सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; न्यायालयाने दिला दिलासा देणारा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणप्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रकरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण प्रकरणी २५ जानेवारी पासून सर्वोच्च न्यायालयात सुरु होणारी अंतिम सुनावणी आजपासूनच सुरु होत आहे. मागील सुनावणी वेळी न्यायालयानं मराठा आरक्षणावरील स्थगित हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, […]

तुम्ही वीजबील भरलं आहे का? नाहीतर बसेल शॉक
बातमी महाराष्ट्र

तुम्ही वीजबील भरलं आहे का? नाहीतर बसेल शॉक

मुंबई : तुम्ही वीजबिल भरले आहे का? नाहीतर महावितरण तुम्हाला मोठा शॉक देण्याच्या तयारीत आहे. महावितरण वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट […]

कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही; बीएस येडियुरप्पाचां इशारा
बातमी महाराष्ट्र

कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही; बीएस येडियुरप्पाचां इशारा

बेळगाव : “कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही,” असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. संवेदनशील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर बेळगावसह अनेक ठिकाणी सोमवारी (18 जानेवारी) निषेध […]