वाह, क्या बात है! पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला वडिलांचा कडक सॅल्यूट
देश बातमी

वाह, क्या बात है! पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला वडिलांचा कडक सॅल्यूट

तिरुपती : आपल्या मुलांनी यशाचे शिखर गाठावे असे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते आणि ते पूर्ण झाले की, त्याच्याही ऊर अभिमानाने भरून येतो. असाच एक क्षण पाहायला मिळाला. आंध्र प्रदेश पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला. हा भावनिक क्षण आंध्र प्रदेश पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला […]

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड
देश बातमी

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांच्या घरी आयकर विभागाची धाड

नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथकाणे धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. रॉबर्ट वाड्रा यांना बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी […]

मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुरु केली मोहीम; ‘मेहेर’ हा मुलींचा हक्कच
देश बातमी

मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सुरु केली मोहीम; ‘मेहेर’ हा मुलींचा हक्कच

कानपूर:  नवीन वर्षाच्या निमित्ताने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने महिलांच्या हक्कांसाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. ‘हक-ए-मेहर अदये’ या नावाने ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेसंदर्भात मंडळाने असे म्हटले आहे की पतीने आपल्या पत्नीला मेहेर (विवाहावेळी दिली जाणारी रक्कम) नक्की दिली पाहिजे. तसेच ती कर्ज म्हणून किंवा उधार म्हणून देऊ नये. मात्र […]

पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर
देश बातमी

२७ दिवसापूसन पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर मागील २७ दिवसांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल ९० रुपयांवर कायम आहे. आज रविवारी ३ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो. जागतिक बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी […]

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही परवानगी मिळाल्याने देश्भारातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ […]

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; घेतला हा मोठा निर्णय
देश बातमी

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; घेतला हा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2021 पासून ही वाढ करण्यात आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 28 टक्के होईल. केंद्र सरकारच्या 50 लाख […]

कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे बंद केलेल्या भारत-यूके विमानसेवेबद्दल केंद्राचा मोठा निर्णय
देश बातमी

कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे बंद केलेल्या भारत-यूके विमानसेवेबद्दल केंद्राचा मोठा निर्णय

मुंबई : भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या प्रसारामुळे ही सेवा 8 जानेवारीपर्यंत रोखली होती. 23 जानेवारीपर्यंत दर आठवड्याला मर्यादीत स्वरूपात सेवा देण्यात येईल. 23 जानेवारीपर्यंत केवळ दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद या ठिकाणांवरून उड्डाणे होतील असे सांगण्यात आले आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शुक्रवारी […]

काँग्रेसचे नेते माजी केंद्रिय गृहमंत्री सरदार बुटा सिंह यांचे निधन
देश बातमी

काँग्रेसचे नेते माजी केंद्रिय गृहमंत्री सरदार बुटा सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. बुटा सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा […]

पुलवामात दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला; आठजण गंभीर जखमी
देश बातमी

पुलवामात दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला; आठजण गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्राल येथील बस स्थानकात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आठ नागरिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा नेम चुकला आणि तो […]

धक्कदायक! आईचा आत्मा परत आणण्यासाठी वीस दिवस पुजाऱ्याने मुलांकडून करून घेतली पूजा
देश बातमी

धक्कदायक! आईचा आत्मा परत आणण्यासाठी वीस दिवस पुजाऱ्याने मुलांकडून करून घेतली पूजा

तामिळनाडू : तामिळनाडूतील दिंडीगुलमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतरही तिचा आत्मा देव परत करेल या आशेवर एका पुजाऱ्याने तब्बल वीस दिवस त्या मुलांकडून पूजा करून घेतल्याची घेतल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूतील दिंडीगुलमधील इंदिरा नावाची महिला दिंडीगुल पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. मात्र मूत्रपिंडाच्या आजाराने […]