कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर

पुणे : राज्यातील इतर भागांप्रमाणे पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाद होताना दिसत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाय योजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना बेड मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु करणार आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तिन्ही सेंटरवर 500 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सुलभ होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर पुन्हा सुरु केले जातील. त्याचबरोबर, तसंच गरज पडल्यास पुन्हा जम्बो कोविड सेंटरही सुरू केले जातील. एकंदरितच कोरोनाला आळा प्रतिबंध घालण्यासाठी पुणे महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहे.

तर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला महापालिकेने सुरुवात केली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रूग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबीच पालिका आयुक्तांनी दिली आहे. तर खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विना सोशल डिस्टन्सिंग आणि 50 टक्के ग्राहकांना प्रवेश देण्याच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंटवर गेल्या काही दिवसांत कारवाई केली जात आहे. तसंच विना मास्क फिरणाऱ्या फिरस्तींवरही महापालिकेने आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.