लस मिळाली तरी गाफील राहू नका: राजेश टोपेंचे आवाहन
कोरोना इम्पॅक्ट

लस मिळाली तरी गाफील राहू नका: राजेश टोपेंचे आवाहन

जालना : लस मिळाली म्हणजे कोरोना होणार नाही असे नाही. कोरोना अजूनही गेला नाही. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असे म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. राज्यात कोविड-१९ लसीसाठी सर्व फेरी (ड्राय रन) सुरु झाल्या आहेत. जालना येथे सराव फेरीच्या केंद्राला आज त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपासून महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोविड ड्राय रन केंद्रावर आज राजेश टोपे यांनी भेट दिल्यानंतर या ड्रायरनचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याचबरोबर आता प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्याच्या तारखेची घोषणा होण्याआधी सर्व आवश्यक तयारी झाली आहे का नाही? याची पडताळणी करण्यासाठी ‘ड्राय रन’ घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशभरात हा ‘ड्राय रन’ होत आहे.

तसेच, महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुण्यातील तीन केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. औंध जिल्हा रुग्णालय, मान प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाची यासाठी निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ड्राय रन’साठी संपूर्ण तयारी झालेली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली गेली आहे.