तर… राज्यातील जनतेला सरसकट मोफत कोविशिल्ड लस द्या
कोरोना इम्पॅक्ट

तर… राज्यातील जनतेला सरसकट मोफत कोविशिल्ड लस द्या

महाराष्ट्रात जर ‘कोरोना’ रूग्ण संख्या परत ‘वाढत’ असेल तर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून सरकार लॉकडाऊन लावणार असेल आणि जनता भयभीत होणार असेल तर… आम्हाला जिवंत राहण्यासाठी ‘केंद्र व राज्य सरकार’ने जनतेला तात्काळ सरसकट ‘कोविशिल्ड लस’ दिली पाहिजे. वर्षभरात खुप वाईट दिवस पाहिले. शेतकरी, कष्टकरी, कामगार उध्वस्त झाले. सर्व सामान्य माणसाला परत देशोधडीला लावू नका. सर्वांना मोफत ‘लस’ दिली पाहिजे. अशी मागणी संभाजी ब्रिगेड’च्या वतीने करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या हस्ते याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. ”कोरोना आणि लॉकडाऊन या मुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आलेला आहे,त्याची आर्थिक बाजू अतिशय कमजोर झाली आहे,छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत आणि काही व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत,याचा प्रशासनाने विचार करावा.आणि सर्वांना कोविशिल्ड लस मोफत द्यावी ही संभाजी ब्रिगेड च्या वतीने प्रशासनाला विनंती आहे,किंवा केंद्रसरकार व राज्यसरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. काहीही करा,पण सर्वांना कोविशिल्ड लस मोफत द्या. ही आदरपूर्वक विनंती आहे. ” अशी मागणी या निवेदाना द्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेणार हे येत्या दहा दिवसातच कळणार आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्यासह राजधानी मुंबईत काल (ता.२४) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल राज्यभरात कोरोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमध्ये झालेत. कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

काल राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी आकडेवारी सादर करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्या वाढवण्याचे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे आदेश दिले. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये दैनंदिन करोना रुग्णांचे प्रमाण दोन हजार ९७३ इतके होते. तर मृत्यूदर हा १.७ टक्के होता. फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन करोना रुग्णांचा आकडा हा तीन हजार ३४७ इतका आहे. तर मृत्यूदर ०.४ टक्के इतका आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकारी प्रकरणांमध्ये वाढ झाली असली तर मृत्यूदर कमी असल्याचे म्हटले आहे.