महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकारही चिंतेत
कोरोना इम्पॅक्ट

 महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकारही चिंतेत

नागपूर शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर नीती आयोग सदस्या डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलतान ते म्हणाले की, ”जर देशाला कोरोनामुक्त ठेवायचं असेल तर व्हायरसला ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही. आम्ही येथे पत्रकार परिषदेसाठी पोहोचत असतानाच नागपूरमध्ये कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. म्हणजे आपण त्या परिस्थितीत पोहोचलो आहोत जिथे पुन्हा एकदा त्याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे,” असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “आम्हाला महाराष्ट्राबद्दल खूप चिंता आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. यामधून दोन धडे मिळतात ते म्हणजे करोना व्हायरसला ग्राह्य धरु नका आणि जर आपल्याला कोविडमुक्त राहायचं असेल तर आपल्याला निर्बंधांचं योग्य पद्धतीने पालन करावं लागेल. सध्या काळ महाराष्ट्रासाठी सर्वात वाईट असून गुरुवारी १३ हजार ६५९ रुग्णांची नोंद करण्यात आली.”

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात करोनाचे २२,८५४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १३, ६५९ रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातील आहे. म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे फक्त महाराष्ट्रातले आहेत. यानंतर केरळमध्ये २४५७, पंजाबमध्ये १३९३ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणात नवीन रुग्ण वाढत आहेत. देशात सध्या १,८९,२२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.