केतकी, प्रियानंतर ‘टाइमपास ३’ मध्ये दिसणार ही अभिनेत्री
मनोरंजन

केतकी, प्रियानंतर ‘टाइमपास ३’ मध्ये दिसणार ही अभिनेत्री

मुंबई : टाईमपासमध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकर दिसली होती. त्यानंतर टाईमपासच्या दुसऱ्या पार्टमध्ये प्रिया बापट दिसली होती. दिग्दर्शक निर्माते रवी जाधव पुन्हा एकदा ‘टाइमपास’च्या तिसऱ्या भागाची तयारी करत असल्याचं समजत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘टाइमपास ३’ असं या सिनेमाचं नाव असून त्यात एका नव्या चेहऱ्याची एंट्री होणार असल्याचं कळतंय. हा नवा चेहरा म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे असल्याचं बोललं जातंय़. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, ऋतानं सिनेमाला होकार दिल्याचं कळतंय. फुलपाखरू…छान किती दिसते…’ हे गाणं किंवा ‘अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है….’ हा संवाद आठवतोय का… दगडूची आठवण झाली ना. लवकरच हा दगडू पुन्हा या टाईमपास ३च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या सिनेमांच्या संहितेवर काम सुरु असून यावेळी देखील संवाद लेखनाची जबाबदारी अभिनेता-लेखक प्रियदर्शन जाधव याच्यावरच असल्याचं कळतंय. दगडूच्या मित्रांच्या त्रिकूटानं पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आता पुन्हा एकदा ही मित्रमंडळी काय धमाल करतात हे बघणं उत्सुकतेचं असेल. सध्या कलाकार मंडळी सिनेमाचं वाचन करत असून लवकरच चित्रीकरणाला देखील सुरुवात होणार आहे. रवी जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतं. आगामी ‘अनन्या’ हा ऋताचा पहिला सिनेमा. आता आणखी एका सिनेमातून ऋता मोठ्या पडद्यावर दिसली तर तिच्या चाहत्यांच्या आनंदात भर पडेल हे निश्चित.