जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या
देश बातमी

जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या

नवी दिल्ली : केंद्रसरकारने लागू केलेय कृषी कायद्यांवरून गेल्या महिनाभरापासून हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस हे आंदोलन आधीच तीव्र होत चालले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबाद बार असोसिएशनचे वकील अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. रोहतकमधील सरकारी रूग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कथित सुसाईड नोटमध्ये अ‍ॅडव्होकेट अमरजितसिंग यांनी असे लिहिले आहे की, केंद्रसरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकण्यास भाग पाडण्यासाठी ते शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ आणि कृषी कायद्याच्या विरोधात आत्महत्या करत आहेत. दरम्यान, पोलिस 18 डिसेंबर रोजी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या सत्यतेची चौकशी करीत आहे. तसेच सिंह यांच्या नातेवाइकांनादेखील कळविण्यात आले आहे. तथापि, यापूर्वीही आत्महत्येची आणखी दोन प्रकरणे दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी चळवळीशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. 65 वर्षीय शीख उपदेशक संत राम सिंह यांनी सिंधू सीमेवर आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सिंह यांनी लिहिलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीत १८ डिसेंबरची तारीख आहे. जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्याचे सांगत अमरजित सिंह यांनी लिहिले आहे की, ‘कृपया शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्यांची रोजी रोटी त्यांच्याकडून हिसकावून घेऊ नका आणि त्यांना विष खाण्यास भाग पाडू नका. सामाजिकदृष्ट्या तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहे आणि राजकीयदृष्ट्या तुम्ही अकाली दलासारख्या मित्रपक्षांचा विश्वासघात केला आहे. पण जनतेचा आवाज हा देवाचा आवाज आहे. आपल्याला गोध्रासारख्या बलिदानाची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. या जागतिक चळवळीच्या माध्यमातून मी आपल्या अंतरात्म्याला आवाज देण्यासाठी बलिदान देत आहे.

शेतकरी आंदोलनातील शेतकरी संघटनेचे गौतम सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ”मन की बात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी थाळी वाजवली. तुमची मनकी बात सांगण्याऐवजी आमची मनकी बात ऐका.’ तर ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीने देशव्यापी संघर्षाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना मंगळवारी (२९ डिसेंबर) निदर्शने करण्याचे केले आहे. शेतकरी संघटनांचे प्रमुख राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमक्या येत असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. आंदोलनस्थळी त्यांच्याभोवती शेतकरी कडे करून उभे राहतात. पोलिसांनी धमकी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.