ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ऋषी कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर काळाच्या पडद्याआड

मुंबई : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रणधीर कपूर यांनी त्यांना चेंबूरमधील इनलॅक्स या रुग्णालयामध्ये तातडीने दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नीतू कपूर यांनी देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. कपूर कुटुंबातील आणखी एक तारा आज बॉलिवूडने गमावला आहे, सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

राजीव कपूर त्यांच्या ‘राम तेरी गंगा मैली..’ (1985) आणि ‘एक जान एक हम’ (1983) मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. आसमान (1984), लव्हर बॉय (1985), जबरदस्त (1985), हम तो चले परदेस (1988) हे देखील त्यांचे विशेष गाजलेले सिनेमा आहेत.जिम्मेदार (1990) या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. त्यानंतर राजीव कपूर यांनी त्यांचा मोर्चा दिग्दर्शिन आणि निर्मितीकडे वळवला होता. ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा प्रेमग्रंथ हा सिनेमा देखील त्यांनी दिग्दर्शित केला होता.