टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता
काम-धंदा

टॅक्स, बँकिंग, सिलेंडरच्या दरांमध्ये होणार मोठे बदल; या आहेत शक्यता

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होऊ घातले आहेत. जुलै महिन्यात टॅक्स, बँकिंग, सिलेंडरचे दरात बदल होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय
1 जुलैपासून एसबीआय बँकेतून एका महिन्यात चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास शुल्क भरावे लागेल. यामध्ये एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांचाही समावेश आहे. चारपेक्षा जास्तवेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये आणि जीएसटी असे शुल्क अदा करावे लागेल. बचत खात्यासाठी सेवा कर भरावा लागेल.

IFSC कोड बदलणार, जुने चेकबुक रद्द होणार..
काही दिवसांपूर्वीच सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले होते. कॅनरा बँकेने सिंडिंकेट बँकेचा IFSC कोड बदलला असून नवा कोड 1 जुलैपासून वापरात येणार आहे. यानंतर सिंडिकेट बँकेचे चेकबुक हे निरुपयोगी ठरेल.

TDS आणि TCS करात वाढ..
गेल्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न न भरणाऱ्यांना 1 जुलैपासून जादा TDS, TCS कर भरावा लागणार आहे. वार्षिक टीडीएस 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्यांना हा नियम लागू होईल.

घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होणार..
पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो.

अल्पबचत योजनांचा व्याजदर घटणार..
केंद्र सरकार 1 जुलैपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करू शकते. गेल्यावर्षी केंद्र सरकारकडून बँकांमधील मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटल्यास सामान्य गुंतवणुकदारांच्या चिंता वाढणार आहेत.