पोकोच्या स्मार्टफोनवर मिळतेय बम्पर सूट; फ्लिपकार्टवर खरेदी केल्यास आकर्षक ऑफर्स
लाइफफंडा

पोकोच्या स्मार्टफोनवर मिळतेय बम्पर सूट; फ्लिपकार्टवर खरेदी केल्यास आकर्षक ऑफर्स

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. उद्योगक्षेत्रालाही याचा फार मोठा फटका बसाल आहे. या काळात स्मार्टफोन मेकर कंपन्यांनादेखील फोनची विक्री करताना अडचणी आल्या. परंतु, स्मार्टफोन मेकर कंपनी नफा मिळविण्यात यशस्वी झाली आहे. त्यामुळे कंपनीने Poco Days sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर केला जात आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल १४ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता संपणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फ्लिपकार्टवरदेखील पोको डेज सेलची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये पोको एक्स 3, पोको सी 3, पोको एम 2 आणि पोको एम 2 प्रो स्मार्टफोनवर जबरदस्त सूट मिळत आहे. याशिवाय फ्लिपकार्ट कडून या स्मार्टफोन खरेदीसाठी आकर्षक ऑफर्स येत आहेत.

पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन (1080×2400 पिक्सल)चा डिस्प्ले दिला आहे. अँड्रॉयड़ १० सोबत येणाऱ्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये फ्रंट, रियर पॅनेल आणि कॅमेऱ्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर शिवाय यात एआय फेस अनलॉकचे फीचर दिले आहे.

आपण फ्लिपकार्टकडून पोकोचा स्मार्टफोन विकत घेतल्यास आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच आपण अ‍ॅक्सिस बँकेच्या बझ क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यास तुम्हाला 10 टक्के सूट आणि ईएमआय सुविधा विना व्याज मिळेल.

या सेलमध्ये poco X२ फोनला १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. या फोनवर २५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Poco M2 फोन सुद्धा या सेलमध्ये १० हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. जर तुम्हाला फोनचा प्रो व्हर्जन हवा असेल तर Poco M2 Pro फोन सुद्धा डिस्काउंटसह १२ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता.

तर Poco X3 फोन १५ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकतो. तर पोको सी ३ फोनवर डिस्काउंट दिला जात आहे. या फोनला तुम्ही ६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकता. ही किंमत फोनच्या ३ जीबी रॅम व्हेरियंटची आहे.