मुलींना कलेक्टर करणार का? म्हणणाऱ्यांना उत्तर देत पाचही मुलींनी दिला धडा
देश बातमी

मुलींना कलेक्टर करणार का? म्हणणाऱ्यांना उत्तर देत पाचही मुलींनी दिला धडा

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील फरीदपूर तहसील अंतर्गत चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांच्या घरात पाच मुली झाल्या. यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होते. मात्र तेव्हा दुसरीकडे लोकांनी 5 मुली म्हणून टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोक म्हणाले की, आता त्यांना कलेक्टर करणार का? मात्र लोकांचे टोमणे खरे झाले. चंद्रसेन सागरच्या पाच मुलींपैकी तीन मुलींनी यूपीएससीची परीक्षा दिली. दोन मुली आज आयएएस आहेत तर तिसरी मुलगी आयआरएस अधिकारी आहे. इतर दोन मुलीही इंजिनिअर आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चंद्रसेन सागर यांची पहिली मुलगी अर्जित सागरने दुसर्‍या प्रयत्नात 2009 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. यानंतर ती सहआयुक्त म्हणून कस्टम विभागात मुंबई येथे रुजू झाली. यादरम्यान आंध्रप्रदेशातील विजयवाड येथे तिचं लग्न झालं. तिचे पतीही आयएएस अधिकारी आहेत. 6 वर्षानंतर 2015 मध्ये, दुसरी मुलगी अर्पितला स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळालं. सध्या ती वलसाडमधील डीडीओ येथे तैनात आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या मुली अश्विनी आणि अंकिता अभियंता आहेत. त्या सध्या मुंबई व नोएडा येथे खासगी नोकरी करत आहे.

चंद्रसेना आणि मीना देवींची सर्वात लहान मुलगी आकृति सागरने 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं. सध्या ती जल मंडळाच्या संचालकपदावर कार्यरत आहे. आकृतीने सांगितले की आम्हाला यूपीएससीच्या तयारीसाठी मामाकडून प्रेरणा मिळाली. मामा अनिल कुमार हे पश्चिम बंगाल केडरचे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. या मुलींचे स्वप्न त्यांच्या मामासारखे एक महान अधिकारी होण्याचे होते. यूपीएससी परीक्षेच्या तयारी दरम्यान त्यांचे काका अनिल कुमार यांनीही खूप सहकार्य केले आहे.