पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार
बातमी विदेश

पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध; आंदोलनात ४ ठार

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. मोदींच्या दौऱ्याविरोधात बांगलादेशात आंदोलन करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याविरोधात बांगलादेशात काही ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यात ४ जण ठार झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या आंदोलनाची पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर रबरी गोळ्यांचा मारा केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी आम्ही आधी आश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही. आंदोलक पोलीस ठाण्यात घुसले आणि तोडफोड सुरू केली. यामुळे रबरी गोळ्यांचा मारा करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याविरोधात राजधानी ढाकामध्येही आंदोलन करण्यात आलं. इथेही आंदोलनाला हिंसक वळण लागलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. यात अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन पत्रकारांचाही समावेश आहे.