अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर
पुणे बातमी

अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर

कोरोना महामारीच्या लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर ‘कोविशिल्ड’ नावाने लस विकसित केली आहे. 1996 मध्ये अदर पूनावाला यांचे वडील सायरस पूनावाला यांनी सीरम संस्थेची स्थापना केली. त्यानंतर 2001 मध्ये कंपनीत रुजू झाले आणि 2011 मध्ये अथक प्रयत्नांनंतर ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. सिरम संस्था कोविड- 19 लस कमी व मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांना पुरविण्यास मदत करेल. अशी प्रतिज्ञा पूनावाला यांनी घेतली आहे.

तर वृत्तपत्र ‘द स्ट्रेट्स टाइम्स’कडून दिल्या जाणाऱ्या ‘एशियन ऑफ दि इयर’ पुरस्कारासाठी झँग यांनी आपल्या टीमसह Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढला होता. तसेच याबाबत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही समावेश आहे, या सर्वांनी लस निर्मितीत मोठे काम केले आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करुन वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचा उल्लेख व्हायरस बस्टर्स असा करण्यात आला आहे.

‘दी स्ट्रेट्स टाइम्स’च्या परदेश विभाग संपादक भाग्यश्री गारेकर यांनी सांगितलं की, “आज एकही दिवस करोनाच्या उल्लेखाशिवाय जात नाही. आम्ही ज्यांची निवड केली आहे ते सर्वजण या सन्मानास पात्र आहेत. आशियातील सर्वात मोठ्या आरोग्य आव्हानाला तोंड देण्यात त्यांनी मदत केली आहे.”