सुबोध जयस्वाल यांच्यानंतर रश्मी शुक्ला यांची सीआरपीएफ’च्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती
बातमी महाराष्ट्र

सुबोध जयस्वाल यांच्यानंतर रश्मी शुक्ला यांची सीआरपीएफ’च्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती

मुंबई : नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अप्पर महासंचालक पदावर प्रतिनियुक्ती झाली आहे. केंद्रीय गृह विभागाच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन पदासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गेल्या वर्षाच्या अखेरीस तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) प्रमुख म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या शुक्ला या दुसऱ्या अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकारी आहेत.

रश्मी शुक्ला या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी समजल्या जातात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना ‘साईड पोस्टिंग’ दिली होती. सरकारशी त्याचे फारसे पटत नसल्याने त्यांनीही जायसवाल यांच्या प्रमाणे केंद्रात जाण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून एक दर्जा कमी असलेले ‘एडीजी’ पद स्वीकारले आहे.

रश्मी शुक्ला या १९८८च्या आयपीएस बँचच्या अधिकारी आहेत. राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी त्यांची पदोन्नतीवर नागरी संरक्षण विभागात बदली केली होती. त्यांच्यासाठी गृहरक्षक दलाशी संलग्न असलेला विभाग स्वतंत्र केला होता. मात्र तुलनेत कमी महत्वाचे पद असल्याने त्यांना त्याठिकाणी काम करण्यात फारसे स्वारस्य नव्हते.त्यामुळे त्यांनी निवृत्तीपर्यत म्हणजे ३० जून २०२४ पर्यत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत रश्मी शुक्ला
रश्मी शुक्ला 1988 च्या बॅचचा आयपीएस अधिकारी आहे.
शुक्ला यांनी मुंबई पोलिसात विविध पदांवर काम केले आहे.
त्या पोलिस दलात शिस्त राखण्यासाठी प्रसिद्ध आहे.
मीरा बोरवणकर यांच्यानंतर रश्मी शुक्ला या पुण्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला पोलिस आयुक्त होत्या.
– त्यांनी जिओलॉजिकल सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.