दिलासादायक! देशात नव्या रुग्णांची संख्या घटली मात्र, धोका कायम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात नव्या रुग्णांची संख्या घटली मात्र, धोका कायम

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. देशात आज सलग सातव्या दिवशी नव्याने बाधित आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आहे. देशात गेल्या २४ तासात एक लाख ३४ हजार १५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर दोन लाख ११ हजार ४९९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १७ लाख १३ हजार ४१३ वर पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता दोन कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात काल दिवसभरात कोरोनामुळे २ हजार ८८७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा आता तीन लाख ३७ हजार ९८९ वर पोहोचला आहे. तर देशातला मृत्यूदर सध्या १.१९ टक्के इतका आहे.

देशातल्या लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता २२ कोटी १० लाख ४३ हजार ६९३ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशातल्या एकूण २४ लाख २६ हजार २६५ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी २१ लाख ९० हजार ९४१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा दोन लाख ३५ हजार ३२४ इतका आहे.