पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी सैनिकाला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक
देश बातमी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी सैनिकाला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने हापूर येथील एका माजी सैनिकास अटक केली आहे. तसेच त्याचा सहकारी अन्स गिलौती यालाही गुजरातमधील गोधरा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. देशाच्या अंतर्गत कामकाजाशी संबंधित माहिती लीक केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. माजी सैनिक सौरभ शर्माला अटक करुन लखनऊला पाठविण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ शर्माविरोधात लखनऊ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ 2013 मध्ये तो भारतीय सैन्यात दाखल झाला होता. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मे 2020 मध्ये त्याने सैन्यातील नोकरीसोडली. यावेळी परदेशातून त्याच्या बँक खात्यात बरीच रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रशांत कुमार पुढे म्हणाले की, सौरभ हापूरच्या बहादूरगड पोलिस स्टेशन परिसरातील बिहुनी गावचा आहे. केवळ पुरेश्या पैश्यांसाठी सौरभ शर्मा आणि त्याचा सहकारी अनस गिलौतीने सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडे पाठविली होती. या आरोपासाखाली लखनऊच्या एटीएस पोलिस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात गोपनीय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैन्यात दाखल झाल्यानंतर सौरभ शर्मा २०१४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीच्या संपर्कात आला. त्या मुलीने सौरभला पत्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यातील संवाद वाढत गेला. ती अनेकदा त्याला सैन्याबद्दल माहिती विचारत असे आणि तोही देत असे. असे करता करता त्याने सैन्याशी संबधित अनेक गोपनीय माहिती मुलीला दिली. काही दिवसानंतर सौरभने पाकिस्तानचा हेर म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्याबदल्यात त्याला पैसे मिळत होते.