गौरवास्पद ! डॉ. बाबासाहेबांचा सन्मान; कॅनडात साजरा होणार समता दिन
बातमी महाराष्ट्र

गौरवास्पद ! डॉ. बाबासाहेबांचा सन्मान; कॅनडात साजरा होणार समता दिन

कोलंबिया – भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 130वी जयंती साजरी होत आहे. कॅनडातील एका प्रांतात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठा सन्मान करण्यात येत असून 14 एप्रिल हा समता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातही 14 एप्रिल रोजी समता दिन साजरा करण्यात येणार आहे. कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताने बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये एक पत्रही जोडलं आहे, त्यानुसार कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात 14 एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा होणार आहे.

तत्पूर्वी, 14 एप्रिल राष्ट्रीय हॉलिडे डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 14 एप्रिल, 2021 रोजी सार्वजनिक सुटी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, 1881च्या सेक्शन 25 च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सराकरने देखील गेल्या वर्षी 14 एप्रिल हा राष्ट्रीय हॉलिडे जाहीर केला होता.