प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ
देश बातमी

प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; चित्रपटसृष्टीत हळहळ

चंदीगड : लोकप्रिय गायक दिलजानचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना जंडियाला गुरुजवळ पहाटे ३च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिलजानची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिसजानचा मृतदेह ताब्यात घेतला. दिलजानचा अपघात कसा झाला? त्याची गाडी दुभाजकाला कशी धडकली? याचा तपास पोलीस करत आहेत. गायक सुकशिंदर शिंदा यांनी दिलजानचे निधन झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. आज सकाळी अतिशय दु:खद बातमी मला कळाली. संगीत क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. दिलजानचे निधन झाले असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

२०१२मध्ये दिलजान टीव्ही रिअॅलिटी शो सुरक्षेत्रचा रनअप ठरला होता. तसेच त्याने पिंड दी या कार्यक्रमात सहाभाग घेतला होता. या शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्याची गाणी कायमच चर्चेत होती. दिलजानने अनेक गाणी गायिली आहेत. त्याने आधा पिंड, यारां दी गल, शूं करके, हर पल, फर्स्ट लव, मेरा दिल, धरती, तेरे शहर ही गाणी गायिली आहेत.