दिल्लीत वाढवला चौथ्यांदा लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
देश बातमी

दिल्लीत वाढवला चौथ्यांदा लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

नवी दिल्ली : दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लॉकडाउनचा अवधी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्लीतील लॉकडाउनचा अवधी १७ मे रोजी संपणार होता. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत अजून एक आठवडा लॉकडाउन असेल असं जाहीर केलं आहे. आता २४ मे पर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. गेल्या आठवड्यात लागू असलेले निर्बंध या आठवड्यातही लागू असणार आहेत. मेट्रो आणि सार्वजनिक ठिकाणी लग्न समारंभावर निर्बंध तसेच राहणार आहेत.

कोरोनाचं संकठ मोठं आहे. लोकं दु:खी आहेत. ही वेळ एकमेकांवर बोट उचलण्याची नाही. तर एकमेकांना मदत करण्याची आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी लोकांची मदत करावी, असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप कार्यकर्त्यांना केलं आहे.