मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.

भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने कोरोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केलं जात आहे. आतापर्यंत चार कोटी ८५ लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा जास्त असे व्यक्ती आहेत ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे.

मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत असंही जावडेकरांनी सांगितलं आहे. फेब्रुवारीमध्ये दिवसाला तीन लाख ७७ हजार कोरोनाचे डोस दिले जायचे. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे, असंही जावडेकरांनी स्पष्ट केलं आहे.