चीनचा कांगावा; म्हणे, कोरोना विषाणूचा उगम भारतातून
विदेश

चीनचा कांगावा; म्हणे, कोरोना विषाणूचा उगम भारतातून

नवी दिल्ली-  संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसचा शाप देऊन त्रस्त करणाऱ्या चीनने आता नवीन कांगावा केला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी अमेरिका आणि इटलीवर कोरोना विषाणूच्या जन्माचे खापर फोडणाऱ्या चीनने कोरोना विषाणूचे उगमस्थान भारतात असल्याचा अजब दावा केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात २०१९ मध्ये उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेदरम्यान प्राण्यांपासून मानवाला विषाणू संसर्ग झाला असावा. ज्या ठिकाणी विषाणूचे कमी म्युटेशन झाले आहे, तिथे विषाणूचा मूळ स्त्रोत असण्याचा दावा करण्यात आल्याचा दावा चीनच्या ‘अकादमी ऑफ सायन्सेस’च्या शास्त्रज्ञांनी  केला आहे. त्यानुसार, भारत, बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इटली, रशिया, झेक प्रजासत्ताक किंवा सर्बियामध्ये विषाणू जन्माला आल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भारत आणि बांगलादेश या ठिकाणी कमी म्युटेशन आढळले आहे. त्यामुळे चीनने भारतावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

चीनमध्ये पहिला रूग्ण आढळला म्हणून चीनमधूनच विषाणूचा प्रसार झाला, असा अर्थ होत नाही. वास्तविक पाहता, भारतातून मासे घेऊन आलेल्या एका मोठ्या कंटेनरमध्ये कोविड १९ विषाणू आढळल्याचा आधारही चीनने दिला आहे.

दरम्यान चीनचा दावा ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठाच्या संशोधकांनी फेटाळला आहे. चीनचे संशोधन सदोष असून ते कोरोना विषाणूबाबत आमच्या ज्ञानामध्ये कसलीही भर घालत नाही, असे संशोधक डेव्हीड रॉबर्टसन यांनी सांगितले आहे.