कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल
देश बातमी

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

बंगळुरु : कोरोनामुळे देशात परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोना संक्रमणातून नेतेमंडळीही सुटली नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. हलका ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यात त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मला हलका ताप होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला त्यात मला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माझी विनंती आहे की, जे कुणी मागच्या दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी काळजी घ्यावी आणि वैयक्तिक क्वारंटाइन व्हावं असं विनंती करणारं ट्वीट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

येडियुरप्पा यांना बंगळुरुच्या रमैया मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ७८ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना गेल्या वर्षीही कोरोनाची लागण झाली होती. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलीलाही कोरोना झाल्यानं रुग्णालयात भरती केलं होतं. योग्य उपचाराअंती दोघांनी कोरोनावर मात केली आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं.