नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाउन जाहीर; असे असतील निर्बंध
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये ११ दिवसांचा लॉकडाउन जाहीर; असे असतील निर्बंध

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये राज्यातील एकूण ९ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात नांदेड शहराचाही समावेश आहे. याबरोबर राज्यात नांदेड जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून नांदेडमध्ये १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नांदेडमध्ये उद्यापासून २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे. नांदेडमध्ये भाजीपाला, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी १२ ही वेळ देण्यात आली आहे. या बरोबरच जिल्ह्यांतर्गत बस सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

नांदेड जिल्हयात करोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३३० इतकी झाली आहे. तर नांदेडमध्ये आज १० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी बीड जिल्ह्यात देखील लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बीडमध्ये २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.