राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर केला असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. या दाव्याला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं उत्तर राजेश टोपे यांनी दिले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषद राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची परिस्थिती सांगितली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“केंद्रीय मंत्र्यांनी आज ट्वीट करुन सांगितलं की महाराष्ट्रात 31 लाख लस उपलब्ध आहेत. दररोज तीन लाख लस या कार्यक्रमानुसार फक्त 10 दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे, असं मी आरोग्य सचिवांना सांगितलं. तसंच आजच्या व्हीसीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब पंतप्रधानांच्या कानावर घातली. प्रकाश जावडेकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करत सांगितलं की, आम्ही दिवसाला 3 लाख दराने लस देत आहोत. त्याप्रमाणे 10 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. लस जाणीवपूर्वक देत नाही असा आमचा आक्षेप नाही. परंतु आम्ही लसीकरणाची गती वाढवली आहे म्हणून रास्त मागणी करत आहोत.”असे राजेश टोपे यांनी म्हंटले आहे.

यासाठी आम्ही केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आम्ही 367 केंद्रांची मागणी केली,. त्यातली 209 केंद्रांना परवानगी मिळाली आहे. उर्वरित केंद्रांना परवानगी मिळणं अपेक्षित आहेत. 100 बेडच्या रुग्णालयांनाच लसीकरणाची परवानगी देण्याची जाचक अट शिथील करून किमान 50 बेडच्या रुग्णालयांनाही परवानगी देण्यात यावी,” अशी मागणी राजेश टोपे यांनी केली.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, “राज्यात आतापर्यंत 33 लाख 65 हजार 952 लोकांचं लसीकरण केलं आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील इतर आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे. राज्यात लसीकरणावर भर दिला जात असून एकूण 1880 सेंटर मंजूर झाले आहेत. काल दिवसभरात 2 लाख 32 हजार 340 एवढ्या लोकांचं लसीकरण झालं आहे. आता दिवसाला 3 लाख लोकांचं लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे. दोन कोटी 30 लाख डोस आपल्याला येत्या तीन महिन्यात आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक आहे. मी स्वत: काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य सचिव राजेश भूषण यांना भेटून केली आहे.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.