वाह…! राममंदिर उभारणीसाठी मुस्लीम उद्योजकाकडून चक्क एक लाखाचा चेक
देश बातमी

वाह…! राममंदिर उभारणीसाठी मुस्लीम उद्योजकाकडून चक्क एक लाखाचा चेक

अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीचा निर्णय दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून आनंद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून लोक आपल्याला जमेल त्याप्रमाणे निधी देत असून आपलाही हातभार लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मंदिर उभारणीसाठी निधी देणाऱ्यांबाबत एक घटना समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राम मंदिरासाठी देशभरातून निधी गोळा केला जात असून जेव्हा स्वयंसेवक तामिळनाडूमधील उद्योजक हबीब यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी १ लाखांचा चेक दिला. त्यांनी दिलेली ही रक्कम पाहून स्वयंसेवकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. “मुस्लीम आणि हिंदूंमध्ये जातीय सलोखा वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण सर्व ईश्वराची मुलं आहोत. याच विश्वासासोबत मी ही रक्कम दान केली आहे.” असं हबीब यांनी सांगितलं आहे.

काही लोक मुस्लिमांना हिंदू आणि देशविरोधी म्हणतात हे पाहून दुख: होतं. चांगल्या कामासाठी मदत करण्यात काही चुकीचं नाही. मी इतर कोणत्याही मंदिरासाठी दान करत नाही, पण राम मंदिराचा मुद्दा वेगळा आहे. यामुळे अयोध्यातील दशकांपासून सुरु असलेला वाद संपला आहे”. अशी भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी राम मंदिराच्या निर्माण कार्यात मदत करत दान करणाऱ्यांमध्ये रोजंदारीवरील मजूर, छोटे व्यापारी यांच्यासारखे लोकही सहभागी आहेत. यासाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (एसआरजेटीके) स्थापन केले आहे. मंदिर बांधणीत देणगी देण्यासाठी 10, 100 आणि 1000 रुपयांची कूपन तयार केली गेली असून मोठ्या संख्येने लोक दान देण्यासाठी पुढे येत आहेत. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राज्य संघटनेचे सचिव एस.व्ही. श्रीनिवासन यांनी दिली आहे.

ते म्हणाले, “आपण ज्या लोकांना जात आहोत तेही उदारपणे देत आहेत.” हिंदु मुन्नानी सदस्य आणि एसआरजेटीके स्वयंसेवक डब्ल्यूएस हबीबकडे गेले असता त्यांनी 1,00,008 रुपयांचा धनादेश सोपविला, ज्यामुळे निधी जमा करणार्‍यांना धक्का बसला. असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.