मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन
देश बातमी

मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे. भारत बंद आणि चर्चेच्या पाच-सहा फेऱ्या पार पडल्यानंतर आता शेतकरी अधिक आक्रमक झाले आहे. आज शेतकरी उपोषण करणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणीही धरणे आंदोलनही केलं जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज एक दिवसाचा उपवास करणार आहेत. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत असतानाचा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘शेती विषयक कायदे रद्द करण्याचे आवाहन केलं आहे. ट्वीट करत प्रकाश राज यांनी पंतप्रधानांना याबाबत आवाहन केले आहे.

नक्की काय ट्वीट केलं आहे प्रकाश राज यांनी ?
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही स्वत: बसा. त्यांच्या नक्की काय समस्या आहेत ते जाणून घ्या. तळगाळातील लोकांचं तुमच्याबद्दल, सरकारबद्दल आणि एकंदर कायद्याबद्दल नक्की काय मत आहे हे समजून घ्या. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास जिंका”, असा सल्ला प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी सारे एकत्र येत असल्याचे म्हटले आहे.

तसेच, शेतकरी आंदोलन, शेतीविषयक विधेयके हे दोन हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.
तर दुसरीकडे, ज्या संघटनांनी आंदोलन मागे घेतले आहे त्या संघटनांबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ”ज्या संघटना आंदोलन मागे घेत आहेत आणि सांगत आहेत की, ते सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहेत. याबाबत आम्ही स्पष्ट करतो की, ते आमच्यासोबत नाहीत. त्यांचे सरकारसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी आमचं आंदोलन कमकुवत करण्याचं षड्यंत्र रचलं आहे. सरकार शेतकऱ्यांचं हे आंदोलन संपवण्याचा कट रचत आहे.” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे की, ते शतकऱ्यांसोबत सोमवारी एक दिवसाचे उपोषण करणार आल्याची माहिती मिळाली आहे. “काही केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजप नेते म्हणत आहेत की, शेतकरी आंदोलन राष्ट्राच्या विरोधी आगे. अनेक माजी सैनिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, गायक, दिग्गज, डॉक्टर, व्यापारी शेतकऱ्यांचं समर्थन करत आहेत. भाजपला विचारायचं आहे की, मग हे सर्व लोक देशद्रोही आहेत का?” असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. तसेच, त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समर्थकांना एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन केलं आहे.