दिलासादायक ! देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या चार लाखांच्या खाली

नवी दिल्ली : देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या ४० हजारांच्या जवळपास आढळत आहे. मंगळवारी देशात ३८ हजार ३५३ कोरोनाबाधित आढळले असून ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाखांच्या खाली आली असून देशात ३ लाख ८६ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या १४० दिवसांतील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९७.४५ टक्क्यांवर आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत ४० हजार १३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १२ लाख २० हजार ९८१ झाली आहे. दरम्यान, आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट २.३४ टक्के असून दिवसाचा पॉझिटीव्हीटी रेट २.१६ टक्के आहे.

गेल्या १६ दिवसांपासून पॉझिटीव्हीटी रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, गेल्या २४ तासांत ४१ लाख ३८ हजार ६४६ जणांचं लसीकरण झालं असून एकूण ५१ कोटी ९० लाख ८० हजार ५२४ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लशींचे ५३.२४ कोटी डोस पुरवले आहेत. तर, ७२ लाख ४० हजार २५० डोस लवकरच राज्यांना पुरवले जाणार आहेत. तर, सर्वच राज्यांकडे २.२५ कोटींपेक्षा जास्त डोस सध्या उपलबध आहेत.